मीठाचा मीठ हा आहारातला अत्यावश्यक घटक असला तरी त्याचं प्रमाण मर्यादित असणं गरजेचं आहे. मीठाचं अतिरिक्त सेवन आरोग्यविषयक अनेक प्रश्नांना जन्म देतं. मीठाच्या अतिरिक्त सेवनानं उच्च रक्तदाब, हृदयविकार, जाडी अथवा पक्षाघात यासारखे धोके वाढतात. त्यामुळेच मीठाऐवजी सैंधव वापरणं उपकारक ठरतं. शरीरात मीठाचं जास्तीचं प्रमाण कमी करण्यासाठी काही पथ्य पाळायला हवी. आहारातील बीन्सचं प्रमाण वाढवल्यास शरीरातील मीठाचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, आहारात बीन्सचं प्रमाण जास्त असेल तर शरीरातील मीठाचं प्रमाण १० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं. दह्यामध्ये मोठया प्रमाणावर प्रोटीनची मात्रा असते. म्हणूनच दह्याच्या सेवनाने शरीरातील मीठाची अतिरिक्त मात्रा कमी होते. मत्स्याहारामुळेही शरीरातील मीठाची अतिरिक्त मात्रा कमी होण्यास मदत होते. विशेषत: साल्मन अथवा ट्यूना माशांमुळे हे काम साधतं. उकडलेला बटाटा सालीसह खावा. यामुळे बटाट्याच्या सालींमध्ये असणाऱ्या पोटॅशियमचा लाभ मिळतो आणि शरीरातील अतिरिक्त मीठाचं प्रमाण कमी होतं. सुक्या मेव्यामध्ये, विशेषत: बेदाण्यामध्ये पोटॅशियमची मात्रा धोक्याचा अधिक असते. त्यामुळे रोजच्या आहारात बेदाण्यांचा समावेश असल्यास शरीराला अतिरिक्त खनिजांचा त्रास जाणवत नाही. पिकलेलं केळ आणि संत्र्यांमध्येही पोटॅशियम अधिक प्रमाणात असतं. त्यामुळे हे घटकही नित्याच्या आहारात समाविष्ट करायला हवेत.
मीठाचा अतिरेक धोक्याचा